अखेर सहा महिन्यानंतर विधिमंडळाचे कामकाज सुरू झाले आहे. विधान भवनात पावसाळी अधिवेशनात कुणीही कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण येऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. पण, संसदीय कार्य विभागाचा एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह असताना विधिमंडळाच्या आवारात फिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारपासून दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन भरवण्यात आले आहे. विधान भवनात येणार्या प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी केली जात आहे. संसदीय कार्य विभागाचा एक अधिकारी हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.